Monday , July 22 2024
Breaking News

कोगनोळी परिसरात तंबाखूचा चाकी कामाची लगबग

Spread the love

उत्पन्न कमी खर्च जास्त : दर चांगला मिळण्याची शेतकर्‍यांची अपेक्षा
कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी, हदनाळ आदी परिसरात तंबाखूच्या चाकी कामाची लगबग सुरू आहे.
या परिसरामध्ये बारमाही वाहणारी दूधगंगा नदी असल्याने व तंबाखू पिकाला खर्च जास्त व उत्पन्न कमी येत असल्याने शेतकरी अन्य पिकांकडे वळण्याची दिसून येत आहे.
त्याचबरोबर व्यापारी यांच्याकडून देण्यात येणारा दर देखील अत्यंत कमी असल्याने खर्च व उत्पन्नाचा मेळ घालताना शेतकरी मेटाकुटीस येत आहे. या सर्व कारणांनी आज या परिसरातील तंबाखू पीक अत्यंत कमी झाले आहे.
चालू वर्षी तंबाखू पिकाला पोषक हवामान व चांगला पाऊस झाल्याने चालू वर्षी तंबाकू पिकाचे उत्पन्न चांगले निघाले आहे. सध्या परिसरांमध्ये तंबाखू कापणी करून घरी आणून त्याची चाकी करण्यामध्ये शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
सदर चाकी कामाला पुरुषाला 300 रुपये मजूरी, तर महिलांना 200 रुपये मजूरी दिली जात आहे. दिवसाला वीस-पंचवीस बोध चाकीचे काम होते.
तंबाखू पिकाला मेहनत जास्त व खर्चही जास्त येत असल्याने या विभागातील शेतकरी अन्य पिकांकडे वळले आहेत. सुरुवातीला सर्वत्र घेण्यात येणारे तंबाखू पीक आता किरकोळ स्वरूपात दिसून येऊ लागले आहे.
व्यापारी यांच्याकडून देण्यात येणारा दर कमी असल्याने हे पीक परवडत नसल्याचे मत शेतकर्‍याने बोलून दाखवले. तंबाखूला मिळणारा दर शंभर रुपये पेक्षा जास्त दर मिळाला तरच हे पीक परवडते अन्यथा ही पीक परवडत नसल्याने येणार्‍या काही दिवसांमध्ये तंबाखू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
सध्या कोगनोळी परिसरात किरकोळ स्वरूपात खरेदी सुरु आहे.
—-
तंबाखूच्या दरात झालेली तफावत पाहता तंबाखू पीक सध्या परवडत नाही यातच कामगार पगार व कामगारांच्या कमतरतेमुळे शेती कामे करणे अवघड जात आहे.
– मानव जगताप, शेतकरी कोगनोळी.
—-
40 वर्षांपासून तंबाखू पिक घेत असल्याने ते बंद करणे योग्य वाटत नसल्याने थोड्या प्रमाणात का असेना दरवर्षी घेत आहे तंबाखू पिकाच्या मेहनतीच्या मानाने दर मिळत नसल्याने सध्या ही पीक परवडत नाही.
– अमोल पाटील, शेतकरी कोगनोळी.

About Belgaum Varta

Check Also

सध्या शिक्षणाला अधिक महत्त्व द्या

Spread the love  क्षमा मेहता; ‘इनरव्हील’तर्फे आनंदी शाळेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सध्या जग बदलत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *