

सुप्रिया पाटील; माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य महिला काँग्रेस सेक्रेटरी पदी निवड झाल्यामुळे आपल्या राजकीय जीवनाच्या वाटचालीला प्रारंभ झाला आहे. त्या माध्यमातून निपाणी मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. नेते मंडळींनी विश्वास ठेवून दिलेल्या पदाशी प्रामाणिकपणे राहून त्यांच्या निर्णयानुसार कार्यरत राहणार असल्याचे, मत सुप्रिया दत्त कुमार पाटील यांनी व्यक्त केले.
येथील दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या कन्या व बेडकिहाळ काँग्रेसचे दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या स्नुषा सुप्रिया दत्तकुमार पाटील यांची कर्नाटक राज्य महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड झाली. त्यानिमित्त येथील नगरपालिकेच्या माजी नगरसेवक संघटना आणि काँग्रेस कार्यकर्त्यातर्फे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, विजय शेटके, प्रवीण भाटले सडोलकर व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होत्या.
माजी सभापती किरण कोकरे यांनी प्रास्तावित केले. चंद्रकांत जासूद यांनी, मतदार संघातील महिला कार्यकर्त्यांची फळी तयार करून परिसराचा पाटील यांनी विकास साधावा. त्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. रियाज बागवान, संजय कांबळे-शेंडूर, मालूताई मिरजे, बेबीजान गुंजाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अल्लाबक्ष बागवान, विश्वास पाटील, बबन घाटगे, संदीप चावरेकर, धनाजी निर्मळे, मुकुंद रावण, अशोक पाटील, तालुका अनुष्ठान योजनेचे अध्यक्ष रमेश जाधव, वैभव पाटील, सिताराम पाटील, मल्लाप्पा मिरजे, रावण, मुन्ना काझी, झाकीर कादरी, जीवन घस्ते, शरीफ बेपारी, सुभाष कांबळे, बाबुराव घस्ते यांच्यासह माजी नगरसेवक संघाचे पदाधिकारी, सदस्य व महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta