
निपाणी (वार्ता) : गुजरात मधील वडोदरा येथे २१ ते २३ नोव्हेंबर अखेर १५ व्या राष्ट्रीय लंगडी स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये कर्नाटक राज्य ज्युनिअर मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात गुजरात बरोबर अटीतटीच्या खेळाचे प्रदर्शन केले. अखेर या संघाला उपविजेते पदावराच समाधान मानावे लागले.
उपविजेत्या संघात भाग्यश्री मोदेनावर, संचिता जबडे, ज्योती बिल्वा, प्रणाली चौगुले, सुषमा बोरागावे, सृष्टी वाघे, रोहिणी भानुसे, त्रिवेणी निडवनी, भाग्यलक्ष्मी, यल्लव्वा यड्रावी, नंदिनी पाटील, मेघा कडलगी, बिरेश कांबळे, रमेश कोलिगुड, महेश मासेकर यांनी सहभाग घेतला होता. संघ प्रशिक्षक म्हणून व्यवस्थापक मल्लिकार्जुन चौगुले प्रशिक्षक शाहरुख गवंडी त्यांनी काम पाहिले. स्पर्धेत रोहिणी भाणुसे हिची बेस्ट डिपेंडर म्हणून निवड करण्यत आली.
विजयी खेळाडूंना राष्ट्रीय लंगडी फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, राज्य लंगडी असोसिएशनच्या अध्यक्षा आमदार शशिकला जोल्ले, कर्नाटक राज्य लंगडी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी एम. के. शिरगुप्पे यांचे मार्गदर्शन लाभले.

Belgaum Varta Belgaum Varta