

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या (मल्टिस्टेट) गळतगा शाखेचा २४ वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानिमित्त सत्यनारायण पूजेचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य शाखेची आर्थिक उलाढाल वाढत असल्याने सभासद व संचालकांनी समाधान व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीशील वाटचालीत मान्यवर, सभासद, ठेवीदार, कर्जदारांनी विश्वास दाखवून संस्थेला हातभार लावल्याबद्दल संचालक मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास धनपाल कागे, जंबू चौगुले, भीमा अकीवाटे, सुभाष तेरदाळे, नाभिराज चौगुले, सुरेंद्र चौगुले (चतुर), आणासाहेब तेगे, बाबासाहेब गंगनावर, श्रीकांत घोसरवाडे, शाम पाटील, संचालक आनंद गिंडे, सुभाष चौगुले, रवींद्र चौगुले, द्वारपाल डोणगे, सुरेश कोंडेकर, उदय तेरदाळे, पोपट रुग्गे, संजय चौगुले, वर्धमान चौगुले, बाबासाहेब पाटील, सुरज मुल्ला, अमीन मुल्ला, हुल्ल्याप्पा लठ्ठे, श्रीकांत मरबिल्ले, महावीर चौगुले, रतन चौगुले यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक अनिल पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta