
बेळगाव जिल्ह्यातील एकमेव संमेलन; समाज प्रबोधनासह विद्यार्थ्यांच्या नवीन संकल्पना नाव
निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथील एचजेसीसी फाऊंडेशनच्या ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे १२ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (१४) रोजी होत आहे. ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी या संकल्पनेतून सुरु असलेल्या विज्ञान प्रसाराच्या या संमेलनाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आहेत. बेळगाव जिल्ह्यात होणाऱ्या एकमेव विज्ञान साहित्य संमेलनात पाच सत्र होणार असून विज्ञान प्रेमी नागरिकासह विद्यार्थ्यांना विज्ञान रहस्यांची पर्वणी ठरणार आहे.

संमेलनाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी हे सध्या किर्लोस्करवाडी येथील भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना संशोधनाची आवड आंतरराष्ट्रीयटेक्निकल मॅगझीनमध्ये तांत्रिक विषयावर त्यांचे पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत. नव्या पंप तंत्रज्ञावर त्यांनी मॅन्चेष्टर इंग्लंड व जर्मनी येथे प्रबंध सादरीकरण केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी विविध उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे अनेक संशोधन लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमधून प्रसिद्ध झाले आहेत.
डॉ. एन. एल. तरवाळ सध्या हे पदार्थविज्ञान अधिविभागामध्ये शिवाजी विद्यापीठ-कोल्हापूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. ते डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनचे (कमवा आणि शिका) माजी अधिक्षक आहेत. त्यांचे ११९ शोधनिबंध हे नामवंत जर्नल्समध्ये प्रसिद्ध आहेत. कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्याप्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांनी व्यसनमुक्ती केंद्राच्या यामधून हजारो लोकांना व्यसनमुक्त केले आहे. मनोरुग्ण लोकांना टेन्शन, भीती, कौटुंबिक समस्या, अंगात येणे, भुताने झपाटणे, करणी, भानामती इत्यादीसाठी सल्ला व मार्गदर्शन करतात. अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या माध्यमातून शेकडो भोंदू बाबांचा पर्दाफाश केला आहे.
डी. एस. शेवाळे हे भोज न्यू इंग्लिश स्कूल येथे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विज्ञान प्रदर्शनात त्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. विज्ञान शिक्षक प्रशिक्षणात त्यांचा सक्रिय असतो.विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आवड निर्माण होण्यासाठी विज्ञान प्रयोगाचे ते प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.
एस. एम. नदाफ हे पांगिरे-बी येथे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निपाणी परिसरात विज्ञानवारी माध्यमातून प्रयोग दिग्दर्शन करतात. त्यांनी राज्यस्तरीय विज्ञान कार्यशाळेत सहभाग आहे. दैनंदिन जीवनातील वस्तू व त्या मागील विज्ञान याबाबत ते प्रायोगिक मार्गदर्शन करणार आहेत.संमेलनात मारुती माने यांच्या स्मरणार्थ विज्ञान आकृती, रांगोळी प्रदर्शन, अटल टिंकरिंग विज्ञान प्रदर्शन, सीसीआरटी भारतीय संस्कृती दर्शन, फोटो प्रदर्शन, स्वामी विवेकानंद जीवन परिचय प्रदर्शन याचे आयोजन केले असल्याची माहिती ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीचे अध्यक्ष एस. एस. चौगुले यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta