
निपाणी (वार्ता) : येथील सॅटर्डे टर्फ क्रिकेट ग्रुप आयोजित जैन प्रिमियर लीग- २०२५ क्रिकेट स्पर्धा भाटले टर्फ येथे पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्बन टस्कर्स आणि वंदे शासनम चॅलेंजर्स यांच्यात अटी तटीची लढत झाली त्यामध्ये वंदे शासनम चॅलेंजर्स क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला २१ हजार १११ रुपयांचे बक्षीस आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
स्पर्धेतील उपविजेत्या अर्बन टस्कर्स संघाला रोख १५ हजार १११ रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. बेस्ट बॅट्समन – यश शाह, बेस्ट बॉलर राज शाह मॅन ऑफ द सीरीज आगम शाह यांनाही सन्मानित करण्यात आले. निकेत शाह, मेहुल शाह, कौशिक मेहता, पारस तलाठी, केवल शाह, रोहन शाह, जीत वखारीया, दर्शन शाह, सुजल मेहता, निनाद वखारीया, आगम शाह, सनिल शाह, पारस शाह, पारस संघवी, अंकिश शाह, पार्श्व शाह, पारस कोठडिया, केवल शहा, प्रतीक शाह यांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेत द लीग लायन्स अर्बन टस्कर्स, राजमणी चॅलेंजर्स,थंडर टायटन्स, एस. के रॉयल, वंदे शासनम चॅलेंजर्स हे संघ सहभागी झाले होते. सर्वच खेळाडूंनी क्रिकेट कौशल्याचे उत्तम प्रदर्शन केले. कोल्हापूर येथील क्रिकेट तज्ञांनी पंच म्हणून काम पाहिले. प्रकाश शाह यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतीक शाह यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta