Saturday , July 27 2024
Breaking News

’देवचंद’ मध्ये विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

Spread the love

टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल : मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता): देवचंद महाविद्यालयापासून सुरु होणार्‍या इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत प्रविष्ट झालेल्या कला शाखेतील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आणि गुणगौरव समारंभ झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रशांत शाह यांच्या हस्ते विशेष प्रावीण्य प्राप्त डी.टी.एस.( देवचंद टॅलेंट सर्च) परीक्षा शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देऊन तसेच नव्याने नियुक्त प्राध्यापकवृंदाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. जी. कागवाडे, पर्यवेक्षक अशोक पवार, पर्यवेक्षिका प्रा. एस. पी. जाधव, कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बारावी कला शाखेला अध्यापन करणारे मराठी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक नानासाहेब जामदार यांचा विद्यार्थ्यांच्याकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक प्रा. विजयकुमार पाटील यांनी केले. प्रा.सागर परीट यांनी देवचंद टॅलेंट सर्च (डी.टी.एस.) परीक्षेमध्ये गुणानुक्रमे घोषित केलेला निकाल पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांक गौरी राजाराम सुतार, द्वितीय क्रमांक साक्षी विष्णू पाटील, तृतीय क्रमांक स्वप्नील विठ्ठल तोंदले, तर उत्तेजनार्थ नेहा भाऊसाहेब परीट आणि साहिल विलास पेडणेकर.
तसेच नव्याने नियुक्त झालेले राज्यशास्त्र विषयाचे प्रा. तुकाराम पाटील, मराठी विषयाचे प्रा. शिवाजी कुंभार, समाजशास्त्र विषयाच्या प्रा. नीलम खेबुडे, हिंदी विषयाच्या प्रा. आशा साळुंखे आणि शारीरिक शिक्षण विषयाचे प्रा.निरंजन जाधव या सर्वांचे प्र. प्राचार्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना प्रा. नानासाहेब जामदार म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षण उत्तम नागरिक बनवते तसेच जीवनातील विविध चढ-उतारांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सक्षम असले पाहिजे आणि त्याची प्रेरणा साहित्याच्या वाचनातून मिळते असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. जी. कागवाडे यांनी बारावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी परीक्षेतील बदललेले नियम, विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना कोणती मानसिक तयारी करावी, तसेच परीक्षेसाठी आपण अभ्यासाची कशी तयारी करावी याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत शहा म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी न होता अष्टपैलू होणे ही काळाची गरज आहे. अति उच्च गुणवत्ता प्राप्त करून आपण उच्च ध्येय गाठू शकतो. परंतु त्याच्याकडे जाण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. जीवनात शिस्त, स्वावलंबन आणि आत्मसन्मान असेल तर आपण यशाची शिखरे गाठू शकतो.
प्रा. विनायक कुंभार, निशा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक प्रतिनिधी प्रा. नामदेव मधाळे यांनी आभार मानले. कार्यक्रम प्रा. राजकुमार कुंभार, प्रा. मनोज काळे, प्रा. नवनाथ कुंभार, प्रा. योगेश पाटील, प्रा. प्रकाश पाटील, डॉ. राहुल घट्टेकरी, प्रा. अर्चना पाटील, प्रा. रूपाली पोवार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साक्षी यादव, शोभा भोसले, सानिका पाटील यांच्यासह कला शाखेतील प्राध्यापक, विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

Spread the love  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *