Saturday , June 15 2024
Breaking News

लसीकरणाची गरज शासनालाच?

Spread the love

दुसर्‍या डोससह बुस्टर डोसला नकारघंटा कायम : केवळ 1756 बुस्टर डोस पूर्ण
निपाणी (वार्ता) : तालुक्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची गरज केवळ शासनाला असल्याचे विदारक चित्र सध्या निपाणी तालुका पाहण्यास मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना नागरिकांकडून दुसर्‍या डोससह बुस्टर डोस घेण्यास नकार घंटा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाला घरोघरी जाऊन लस घ्या, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटांनी थैमान घातले आहे. यात कोरोना पहिल्या व दुसर्‍या लाटेत अनेकांचा जीव गेला. तर दुसर्‍या लाटेत तालुक्यातील रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या ही अपुरी पडत होत्या. शिवाय दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली होती. कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिकांची लसीकरण केंद्रासमोर रांगा लागल्या. त्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठाही कमी होत होता. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
दुसर्‍या लाटेदरम्यान झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेदरम्यान रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यासह ऑक्सिजनची गरज भासली नाही, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली आणि कमीही झाली. दरम्यान तालुक्यात आजघडीला 18 वर्षांपुढील 2 लाख 9 हजार 713 जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे 93 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र दुसरा डोस घेताना अनेकांची नकारघंटा कायम आहे. आतापर्यंत 2 लाख 16 हजार 210 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ही आकडेवारी पाहता नागरिकांकडून मोफत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसर्‍या डोसासह बुस्टर डोसकडे काणाडोळा केलाजात असल्याचे विदारक चित्र आहे. परिणामी लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध असताना ही नागरिक येत नसल्याने ते ओस पडले आहेत. त्यामुळे कोरोना लसीकरणाची गरज केवळ शासनाला असल्याचा भास होत असून नागरिकांनी ही स्वतःच्या सुरक्षेसाठी शासनाकडून मोफत दिली जात असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दुसर्‍या डोसासह बुस्टर डोस घेणे ही आज काळाची गरज आहे.

’शासनासह जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याकडे काणाडोळा केला जात आहे. लसी साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा दुसर्‍या डोसासह बुस्टर डोस घ्यावा.’
-डॉ. व्ही. व्ही. शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिक्कोडी.

About Belgaum Varta

Check Also

जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान नुकसान झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *