खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाटावर खानापूर, बेळगाव तालुक्यातील भाविकांनी मंगळवारी दि. 1 मार्च रोजी महाशिवारात्रीच्या निमित्ताने स्नानासाठी एकच गर्दी केली होती.
सकाळी आठ वाजल्यापासून मलप्रभा नदी घाटावर स्नान करून मलप्रभा नदीची पुजा, नैवेद्य दाखवून मनोभावे पुजा करत होते.
यावेळी मलप्रभा नदी काठावर नैवेद्य व महाप्रसादासाठी स्वयंपाकाचे आयोजन करत होते.
यावेळी यल्लम्मा देवीचे भक्तही मलप्रभा नदीच्या पुजेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मलप्रभा नदी परिसरात अपघाती घटना घडू नये. यासाठी पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. याचबरोबर महाशिवरात्रीनिमित्त मलप्रभा नदी घाटाजवळील शंभूमहादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याचवेळी महादेव मंदिरात भटजींच्याहस्ते अभिषेकासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
शहरातील हेस्कॉम कार्यालयाच्या आवारात असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त पुजेसाठी भाविकांची गर्दी होती.
असोगा (ता. खानापूर) येथील, मलप्रभा नदी काठावर असलेल्या रामलिंगेश्वर मंदिरातही महाशिवारात्रीच्या सणानिमित्ताने भाविकांनी गर्दी केली होती. याठिकाणी खानापूर, बेळगाव तालुक्यातील भाविक वाहनातून येऊन महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी हरहर महादेवची गर्जना भाविक करत होते.
