बेळगाव : शाहूनगरमधील बसवण्णा मंदिर कमिटीच्यावतीने महाशिवरात्री निमित महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी मंदिर कमिटीच्यावतीने मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
या निमित्ताने सकाळी कमिटी अध्यक्ष श्रीकांत कदम, उपाध्यक्ष श्री. बामणे, श्री. अंगडी यांचेसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी मंदिरात बसवण्णा महादेवाचे विधीवत पूजन करून महापूजा करण्यात आली. त्यानंतर कमिटीच्यावतीने नगरसेविका रेश्मा पाटील, नगरसेवक श्रेयस नाकाडी, प्रमुख अतिथी गौरी बजंत्री, सीपीआय मंजूनाथ हिरेमठ व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रविण पाटीलसह मंदिर कमिटीचे सर्व सदस्य व भाविक उपस्थित होते.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …