Wednesday , March 4 2026
Breaking News

इंदिरा कॅन्टीनच्या कामाबाबत कंत्राटदाराची कानउघाडणी

Spread the love

 

बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळेंकडून पाहणी ; दर्जात्मक कामाची सूचना

निपाणी (वार्ता) : कष्टकरी व सामान्यांनाना ५ रुपयात नाश्ता आणि १० रुपयात जेवण देण्यासाठी सिद्धरामय्या सरकारने निपाणी येथे इंदिरा कॅन्टीन मंजूर केले आहे. इमारतीसाठी ४८ लाख आणि स्वयंपाक खोलीसाठी ८७ लाखाचा निधीही दिला आहे. येथील बस स्थानकाच्या आवारात कॅन्टीन इमारत बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी शुक्रवारी (ता.२६) अचानक भेट देऊन कामाची पाहणी केले. यावेळी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी संबंधित कंत्राटदारांची चांगलीच कानउघडणी केली. शिवाय निकृष्ट बांधकाम काढून दर्जात्मक काम करण्याची सूचना केली.
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी पालिका पदाधिकाऱ्यांसह शहरात इंदिरा गांधी कॅन्टीन निर्मितीसाठी बसस्थानक आवारात जागा निश्चित केली.
यावेळी आगाराकडून विरोध होत असताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची शिष्टाई कामास आल्याने जागेचा प्रश्न मार्गी लागून कामास प्रारंभ झाला. त्यानुसार येथील बसस्थानक आवारात सदर कॅन्टीन निर्मिती केली जात आहे. पण संबंधित कंत्रालदाराने योग्य पद्धतीने पाया काढलेला नाही. शिवाय कळ्या मातीसह प्लास्टिक कचरा असलेल्या जागेवर स्लॅब घालून जमीन तयार केली आहे. या इमारतीच्या बांधकामाचे वजन ६० टनापेक्षाअधिक असल्याने ही इमारत धोकादायक बनू शकते. निकृष्ट बांधकामामुळे भविष्यात इमारत कोसळण्याची भीती आहे.
इमारत बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊनही कंत्राटदारांने चुकीच्या पद्धतीने काम केले आहे. त्यामुळे भराव घालूनच पुढील इमारतीचे काम करण्याची सूचना चिंगळे यांनी केली आहे. त्यांनी अचानक भेट देऊन पाहणी केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला चांगलाच दणका बसला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत, रामचंद्र निकम, ॲड. संजय चव्हाण त्यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

लेटेक्स कॉलनीत मूलभूत सुविधा न दिल्यास नगरपालिके समोर नागरिकांचा उपोषणाचा इशारा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहरा बाहेर असलेल्या लेटेक्स कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *