Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणीत ‘मालक चषक’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Spread the love

 

अडीच लाखांची बक्षिसे : उद्योजक रोहन साळवे फाउंडेशनतर्फे आयोजन

निपाणी (वार्ता) : स्थानिक क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने येथील रोहन साळवे फाउंडेशनतर्फे प्रभाग निहाय आयोजित दिवस -रात्र प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा ११ जानेवारीपर्यंत होणार आहेत.
विजेत्या संघांना अनुक्रमे ५१ हजार, रुपये व चषक, ३१ हजार व चषक, ११ हजार रुपये व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय मॅन ऑफ द सेरीजसाठी ५ हजार रुपये आणि चषक, मॅन ऑफ द मॅच साठी २५०० रुपये आणि चषक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजसाठी २५०० रुपये रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धा सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालणार आहेत.
स्पर्धेसाठी एकूण अडीच लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच रोहन साळवे फाउंडेशनतर्फे सर्व खेळाडूंना टी-शर्ट आणि सहभागी संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहेत. प्रारंभी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तर रवींद्र शिंदे यांच्या हस्ते यस्टी पूजन झाले. पोलिस खात्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. लक्ष्मण चिंगळे यांनी,शहरातील प्रभागानुसार नवोदित क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रोहन साळवे यांनी करून खऱ्या अर्थाने अशा खेळाडूंना वाव मिळवून दिला आहे. प्रकाश झोतातील या सामन्यामुळे नवोदित खेळाडूंना एक प्रकारची नवी संधी मिळणार असून शहरातील नवोदित क्रिकेटपटू या माध्यमातून उदयास येणार असल्याचे सांगितले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रोहन साळवे फाउंडेशनचे युवा उद्योजक रोहन साळवे, पंकज पाटील, सुजय पाटील, राजेश कदम, बसवराज पाटील, रवींद्र शिंदे, विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, किरण कोकरे, अल्लाबक्ष बागवान, मुन्ना काझी, रवींद्र श्रीखंडे, अशोक लाखे, युवराज पोळ, दादासाहेब जाधव, शरीफ बेपारी, सोमनाथ शिंदे, ओंकार शिंदे, प्रतिक शहा, अब्बास फरास, सुरेश घाटगे, मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, शिवराज नाईकवडी, अंजुम उर्फ अनिल भोसले, अस्लम शिकलगार, बबलू मांगोरे, दादासाहेब हळवणकर, संतोष कांबळे (कार्लोस), दिपक सावंत, रघुनाथ नाईकवाडे, संतोष कांबळे, राजू नाईक, सुनील हिरुगडे, अरविंद पारळे, ओंकार बोंगार्डे, चेतन पांगिरे, बाळासाहेब कमते, संदीप पावले यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *