सौंदलगा : येथील श्री महादेव मंदिरामध्ये सकाळी अभिषेक, रुद्राची अकरा आवर्तने, श्री सूक्त, 108 नामावली आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात झाले. या धार्मिक कार्यक्रमाच्या यजमानपदी डॉ. सुहास कुलकर्णी, नचिकेत कुलकर्णी, वैभव कुलकर्णी हे होते. या सर्व धार्मिक विधीचे पौराहित्य मुकुंद जोशी, शशिकांत जोशी, अंबादास बावडेकर, प्रदीप जोशी, बाळासाहेब कुलकर्णी, प्रसाद जोशी, देविदास बावडेकर यांनी केले. यानंतर भाविक भक्तांनी शिवलिंगावरती बेल, फुले वाहिली. याबरोबरच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये, श्री रुद्राचे वाचन, हवन आणि श्री शिवअष्टोत्तर नामावली असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
सकाळपासून शिवमंदिरात धार्मिक वातावरणात भाविक- भक्त बेल, फुले वाहून संध्याकाळपर्यंत दर्शनासाठी येत होते.
