Saturday , March 7 2026
Breaking News

आरोग्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आवश्यक

Spread the love

 

प्राचार्य डॉ. किरण मुत्नळी; बागेवाडी महाविद्यालयातर्फे आरोग्य शिबिर

निपाणी (वार्ता) : आधुनिक तंत्रज्ञान आणि कामांच्या धावपळीमुळे प्रत्येकाला वेळ अपुरा पडत आहे. परिणामी वेळेत आरोग्यासाठी जेवण, व्यायामाकडे दुरुस्त होत आह. परिणामी विविध प्रकारचे आजार जडत आहेत. त्यावर हजारो रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना फटका बसत आहे. ही बाब प्रत्येकाने गांभीर्याने घेऊन आहारावल नियंत्रण ठेवण्यासह नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, असे मत प्राचार्य डॉ. किरण मुत्नळी यांनी व्यक्त केले.

बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी‌ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि केएलई संस्थेच्य चिक्कोडी येथील आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने चिखलव्हाळमध्ये आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात रक्तदाब, मधुमेह तपासह विविध आरोग्य समस्या बाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय आयुर्वेदिक उपचारांद्वारे संधिवात, पाठदुखी, मायग्रेन, त्वचारोग आजारांची तपासणी करून योग्य उपचारांसह मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी परिसरातील सुमारे २०० गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
यावेळअधिकारी डॉ. आनंद केंचक्कनवर, प्रा. डॉ. श्रीपती रायमाने, डॉ. सुनीता हुन्नरगी, डॉ. सतीश नाईक हे उपस्थित होते. कार्यक्रमात महाविद्यालयातील कर्मचारी स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण झालु.
कार्यक्रमास डेप्युटी एम. एस. डॉ. बहुबली महाजन, डॉ. श्रीधर लक्कुंडी, डॉ. कांचना, डॉ. कोमल जाधव, डॉ. विश्वनाथ, डॉ. हरिशंकर,महाविद्यालयाच्या रोव्हर्स आणि रेंजर्स युनिटचे प्रमुख डॉ. बी. एम. जनगौडा, डॉ. एम. डी. गुरव एस. एस. सुन्नाळ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अकोळ विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाच्या नूतन इमारतीचा सोमवारी उद्घाटन, शतक महोत्सवपूर्ती सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : संघाचे सभासद, ग्राहक ठेवीदार, पदाधिकारी हितचिंतकांच्या सहकार्याने अकोळ विविधोद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *