ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने : शेतकऱ्यांच्या मागणीला यश
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून याठिकाणी कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार होते. यामुळे येथील शेतकऱ्यांची सुपीक जमीन यामध्ये जाणार होती. यासाठी येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन ब्रिज रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती.
येथील शेतकऱ्यांनी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्याकडे येथील शेतकऱ्यांची जमीन जात असल्याने शेतकरी बेरोजगार होणार असून जमीन संपादन करण्यात येऊ नये, या ठिकाणी होणारा उड्डाणपूल बंद करण्यात यावा अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन मंत्री शशिकला जोले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी संबंधित विभागाशी बोलून या ठिकाणी होणारा उड्डाणपूल बंद केल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
उड्डाणपूल रद्द करण्यात आला असल्याची माहिती खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी येथील शेतकऱ्यांना दिले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने यांनी दिली.
यावेळी कुमार व्हटकर, कबीर मुल्ला, तौसीफ मुल्ला, गब्बर मुल्ला, प्रकाश पवार, संतोष पाटील, अल्लाउद्दीन शिरगुप्पे, मधुकर इंगवले, अण्णासाहेब चौगुले, शिवाजी घोसरवाडे, झाकीर नाईकवाडे, विठ्ठल माने, मधुकर माने, शितल मळगे, प्रकाश पवार, अफजल मुल्ला, रावसाहेब माणगावे यांच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
