Wednesday , March 11 2026
Breaking News

वस्त्रोद्योग खात्यातील कोट्यावधी रुपयाचा निधी लाटला

Spread the love

 

बोरगाव येथे बैठक ; कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी बोगस दाखले व कागदपत्रे देऊन कर्नाटक राज्याचा वस्त्रोद्योग खात्यातील कोट्यावधी रुपयाचा निधी लाटला आहे. काहींचे व्यवसाय बंद तर काहींनी भाडेतत्त्वावर इतरांना दिले आहे. या वस्त्रोद्योग पार्कात कोटधावधी रुपयाचा झालेला चौकशीचा ससेमिरा लागणार म्हणून अनेकांनी रात्री बंद असलेल्या युनिटमध्ये व्यवसाय उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे बंद असलेल्या व बोगस लाभार्थ्यांची सरकारने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी बोरगाव येथील विद्याधर अम्मनावर, शिशिर सातपुते भाऊसाहेब पाटील, शिवाप्पा माळगे अण्णासाहेब बरवाडे, राजू खिचडे, नगरसेवक रोहित पाटील, भरत हवले, बाळासाहेब बसन्नावर, अशोक हवले, धनपाल हवले यांनी येथे आयोजित बैठकीत केली.
वरील नागरिकांनी दिलेली माहिती अशी, येथील सर्वे नंबर १८४ मधील कर्नाटक राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग खात्याने सीमा भागातील बेरोजगार व सर्वसामान्य कुटुंबीयांची आर्थिक प्रगती साधण्याच्या उद्देशाने टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात आली. शासनमान्य युनिटना मंजुरी व सबसिडी देण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील मोजक्याच लाभार्थ्यांना लाभ तर महाराष्ट्रातील अनेकांनी बोरगावातील एकाला व अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयाचा निधी लाटला आहे. या वस्त्रोद्योग पार्क मधील बोगस लाभार्थी व कोणताही उद्योगधंदा नसलेल्या युनिटमधील प्रमुखांनी चौकशीचा ससेमेरा लागणार म्हणून काही दिवसापासून बंद असलेल्या युनिटमध्ये जुन्या मशिनरी व इतर साहित्य आणून उद्योगचालू करण्याचा खटाटोप सुरू केला आहे.
बोरगावच्या एका मध्यस्थीने याप्रकरणी कोट्यावधी रुपयांचा डल्ला मारला आहे. बोरगावच्या मध्यस्थी व वस्त्रोद्योग खात्यामधील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वस्त्रोद्योग, मंत्री शिवानंद पाटील, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियंका जारकीहोळी व बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांना कागदपत्रे देणार असल्याचे तक्रारदारांनी सांगितले.
—-

About Belgaum Varta

Check Also

अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने बोरगाव सर्कल रुंदीकरणाचे काम ठप्प

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सर्कल परिसरात अतिक्रमण वाढल्याने वारंवार वाहतुक कोंडीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *