Wednesday , June 17 2026
Breaking News

युद्धाचा भडका अन् गॅस टंचाईसह दरवाढीचा फटका

Spread the love

 

हॉटेल व्यावसायिकांची धावाधाव; चढ्या दराने सिलिंडर घेण्याची वेळ

निपाणी (वार्ता) : जागतिक स्तरावर युद्धाचा भडका उडाला, तसा गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे घरगुती गॅस २१ दिवसांनी मिळणार आहे, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणे दुरापास्त झाले आहे. हॉटेल व्यावसायिक सिलिंडरसाठी दुप्पट रक्कम मोजत आहेत. तरीही त्यांना सिलिंडर मिळत नाहीत.
गेल्या आठवड्यापासून युद्धाचा प्रत्यक्ष परिणाम या भागातील गॅस वितरणावर होत आहे. गॅस सिलिंडर नोंदणीसाठीच्या ऑनलाइन नंबरवर तांत्रिक दोष असल्याचे उत्तर मिळत आहे. सिलिंडर वितरित करणाऱ्या कांही टेम्पो चालकांनीही सार्वजनिक फोन नंबर बंद ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गॅस टंचाई झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, एजन्सीकडून नियमानुसार गॅस मिळणार असल्याचे उत्तर दिले जात आहे.
अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठा सुरळीत करा, गॅस वितरणामध्ये कोणी काळाबाजार केल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल. तालुक्यातील एलपीजी गॅस गोदामांची विशेष पथकामार्फत अचानक तपासणी करावी. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. सिलिंडरमध्ये गॅस भरून देण्याचे नियोजन काही एजन्सींनी केले आहे. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रियेत अडथळे येत असल्याने ग्राहकांमधून संभ्रम निर्माण होत आहे. मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांचे हाल होत आहेत.
——————————————————————-
‘हॉटेलसाठी गॅस मिळणे दुरापास्त होत आहे. नोंदणीकृत केलेल्या व्यावसायिक सिलिंडरही मिळत नाहीत. अनेक व्यावसायिकांना गॅससाठी दुप्पट किंमत मोजावी लागत आहे.’
– संदीप खडके, हॉटेल व्यवसायिक, निपाणी
——————————————————————–
‘गॅस वितरण आणि दरासंदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन १८००२२४३४४, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड १८००-२३३३-५५५, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड १८००-२३३३-५५५ या टोल फ्री क्रमांकावर अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधवा.’
– अभिजीत गायकवाड, पुरवठा अधिकारी, निपाण

About Belgaum Varta

Check Also

‘रवळनाथ’ हौसिंग फायनान्सच्या सेवकांना सुधारित वेतन लागू : संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांची माहिती

Spread the love  निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कायम सेवेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *