Wednesday , June 17 2026
Breaking News

सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथे जागतिक महिला दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत पी. के. घोलपे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थिनींच्या महिला स्फूर्ती गीताने झाली. इतिहास घडविणाऱ्या व समाजाला दिशा दाखविणाऱ्या थोर महिलांच्या वेशभूषा विद्यार्थिनींनी साकारल्या होत्या. यामध्ये हिंदवी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, ओनके ओबवा, भारतीय अवकाश कन्या कल्पना चावला, इंदिरा गांधी, किरण बेदी प्रतिभाताई पाटील, मदर तेरेसा, द्रौपदी मुर्मू, सिंधुताई सपकाळ यासारख्या विविध व्यक्तीरेखा विद्यार्थिनीनी साकारलेल्या होत्या. महिला दिना विषयी अनेक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती बी. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुली वाचवा, मानवी प्रजाती वाचवा. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी एकमेकांशी बंधू-भगिनीच नातं वृद्धिंगत केलं पाहिजे. यावेळी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष अप्पाजी गाडेकर, श्री. जे. आर. बागेवाडी, श्रीमती एम. आर. एन. गोळकर, श्रीमती नागुली चौगुले, श्रीमती प्रतिभा सि. व्ही. उपस्थित होते. सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती आर एस पाटील यांनी केले, आभार प्रदर्शन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. वैजनाथ रामाराव यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली शिक्षिकेची तब्बल 30 लाखांची ऑनलाइन फसवणूक

Spread the love  बेळगाव : ऑनलाईन काम करून सहज पैसे कमावण्याचे आमिष दाखवत शाहूनगर येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *