Tuesday , August 25 2026
Breaking News

महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्दमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित संस्थेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकारत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी होते.
संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर, श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
डॉ. कुरबेट्टी म्हणाले, सध्याच्या जीवनात स्त्रिया आपली कौटुंबिक जबाबदारी पार आहेत. कांही स्त्रिया व्यवसायामध्ये तर कांही स्त्रिया शेती व्यवसायामध्ये प्रगती करून यश संपादन करीत आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाचा वाटा आहे. आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी मुलींची पहिला शाळा सुरू करून स्त्री जातीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचे सांगितले. कर्मचारी पूजा इंगळे, शुभांगी गुमटन्नावर आणि प्रीतम चौगुले यांनी जागतिक महिला दिनाबद्दल विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास संचालक श्रीकांत परमणे, सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पटणशेट्टी, सीईओ एस. के. आदनावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रेश फुटाणे, विद्या कमते, महादेव बडीगेर, सुरज घोडके, चंद्रकांत हणबर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सुजाता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गायकवाड यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *