चाव्यासह विविध प्रकारच्या रंगसंगती; आधुनिक माठांकडे नागरिकांचा कल
निपाणी (वार्ता) : यावर्षी मार्च महिन्याच्या प्रारंभापासूनच उन्हाचा तडाका वाढला असून उष्मा वाढत आहे. त्यापासून गारवा मिळवण्यासाठी नागरिक थंड पाण्यास पसंती देत आहेत. परंतु फ्रिजपेक्षा माठातील पाणी आरोग्यास आयुक्त असल्याने शहर व ग्रामीण भागात माठांना मागणी वाढली आहे. पण स्थानिक माठावर राजस्थान मधील माठाने अतिक्रमण केल्याने स्थानिक व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. सध्या बाजारपेठेत चाव्यासह वेगवेगळ्या रंगसंगतीतील नानाविध प्रकाराचे माठ उपलब्ध झाले आहेत.
शहर व उपनगर परिसरातील नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी माठ खेरेदीला सुरुवात केली आहे. शहरात कमाल तापमानात दिवसें दिवस वाढत होत आहे. शहरांतील कमाल तापमान साधारण २७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. परिसरात तापमानात वाढ झाल्याने सध्या उन्हाळ्याची चाहूल व चटका जाणवत आहे. एप्रिल-मे महिन्यांत जाणवणारे उन्हाचे चटके मार्च महिन्याच जाणवत आहेत. माठात लवकर पाणी थंड होते. काळे रंगाचे माठ काळ्या मातीपासून तयार केल्यामुळे ते काळे रंगाचे माठ म्हणून बाजारपेठेत खरेदीसाठी विक्रीसाठी ठेवले आहेत. पण नागरिकांचा कल राजस्थानी माठाकडेच आहे.
——————————————————————-
माठांचे प्रकार / माठाच्या किंमती
* साधा माठ / १५० -२०० रुपये
* राजस्थानी माठ / २५० ते ३५०
* लाल माठ / २२५ ते ३०० रुपये
* बिगर तोटीचा माठ / २०० ते ३०० रुपये
* तोटीचा माठ / ३४० ते ४५०
* मातीची बाटली / १०० ते २००
* रांजन / २६० ते ६०० रुपये
——————————————————————-
‘सध्या राजस्थानमधील आधुनिक तोट्यासह विविध रंगसंगतीच्या माठांना मागणी वाढत आहे. शिवाय त्यातून पाणी झिरपत नसल्याने त्यालाच पसंती मिळत आहे.’
– घनश्याम, माठ विक्रेते, व्यवसायिक, राजस्थान.
Belgaum Varta Belgaum Varta