
दुपारपर्यंत भाविकांची गर्दी ; पाळणासह सुंठवडा वाटप
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात गुरुवारी (ता.२) विविध ठिकाणी हनुमान जयंती झाली. त्यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. सर्वत्र ‘बजरंग बली की जय’ चा जयघोष सुरू होता. यावेळी महिलांनी पाळणा सादर केल्यावर सुंठवडा वाटप करण्यात आले.
येथील साखरवाडीतील पुरातन हनुमान मंदिरात सचिन पोवार यांनी अभिषेक केला. सुवर्णा जाधव, ज्योती पोवार, नम्रता कमते, सुषमा कोले, लीलावती कुंभार, सुषमा जाधव, सुगंधा साळुंखे, लीला कुंभार, गौरी -हाटवळ, कावेरी लोहार, जयश्री कुंभार व महिलांनी पाळणा सादर केला. त्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी करण साळुंखे, शिवाजी साळुंखे, सुरेश बोरगावे, ओंकार लोहार, विकास गायकवाड, अजित पारळे, सचिन चौगुले, आदेश कुंभार, अतुल चावरेकर, करण साळुंखे, भरत इंदलकर, जयराम कदम यांच्यासह भाविक उपस्थित होते.
येथील शाहू नगरातील पूर्वाभिमुख हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.१) रात्री आंदोलन नगरातील माऊली भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. गुरुवारी (ता.२) पहाटे चार वाजता दादासाहेब खोत व भाविकांचे हस्ते हनुमान मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. महिलांनी पाळणा सादर केल्यावर सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी अशोक भोसले, विश्वनाथ जाधव, रघुनाथ मातीवडर, शिवाजी निंबाळकर, विकास शिंदे, किशोर जाधव, विनोद माने, विजय गुंडाळे, नितीन उपाळे, प्रा. आर. के. दिवाकर, राजाराम विटेकरी यांच्यासह भावी व महिला उपस्थित होत्या.
येथील प्रगतीनगरमध्ये चंद्रशेखर हिरेमठ- स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लता हिरेमठ शिल्पा मलाबादे, अजयश्री टिकारे, वनिता शिंदे, सविता लोळसुरे, डॉ. माधुरी खोत, भारती मगदूम यांच्या असे महिलांनी पाळणा सादर केला. यावेळी बाबुराव मलाबादे, बाळासाहेब शेडगे, विजय कबाडे यांच्यासह भावीक उपस्थित होते. मंगळवार पेठेल हनुमान मंदिरात वेदमूर्ती गुरु सिद्धेश्वर हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली गणेश देशमाने, मृणाल कुरबेट्टी, विनायक कदम यांनी रुद्राभिषेक केला. त्यानंतर महिलांनी पाळणा सादर केला, यावेळी डॉ. सी. बी. कुरबेट्टी, नितीन वाली, सुदीप येडुरे, सनी शिवपुरे, अविनाश कदम, संदीप बरडे व भाविक उपस्थित होते. येथील मुरगुड रोडवरील राजश्री चित्रमंदिर समोरील हनुमान मंदिरात रिक्षा स्टॉपतर्फे हनुमान जयंती साजरी करण्यात आली. अभिषेक, पाळणा, सुंठवडा वाटप असे कार्यक्रम पार पडले.
Belgaum Varta Belgaum Varta