Tuesday , April 7 2026
Breaking News

निपाणीत ११ पासून ‘अरिहंत चषक’ क्रिकेट स्पर्धेचा धमाका

Spread the love

 

सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील जयंती निमित्त आयोजन :१२ लाखाच्या खर्चाची प्रथमच स्पर्धा

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त, अरिहंत उ‌द्योग समूह व छत्रपती शिवाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून (ता.११) ‘अरिहंत चषक पर्व -३ – २०२६’ दिवसरात्र टेनिस बॉल आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी अनुक्रमे २ लाख रुपये आणि अरिहंत चषक, १ लाख रुपये आणि चषक, ५० हजार रुपये आणि चषक बक्षीसे देण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत मोरे यांनी दिली.
मोरे म्हणाले, मलिकावीर खेळाडूला फ्रिज, सर्वोत्कृष्ट फलंदाजला मोबाईल फोन, सर्वोत्कृष्ट गोलंदाजला सायकल आणि प्रत्येक सामन्यातील सामनावीरल चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत निवडक २४ सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामध्ये बेळगाव, विजयपूर, हुबळी, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, तुळजापूरसह मांगले, नारायणवाडी, बोरगाव अशा नामांकित व बलाढ्य संघ सहभागी होणार आहेत. सामने ८ षटकांच्या स्वरूपात खेळवले जातील.
गाव पातळीवरील संघांना २ आयकॉन खेळाडू निवडण्याची परवानगी आहे. याशिवाय स्पर्धा नॉकआऊट पद्धतीने खेळवली जातील. स्पर्धेत विजय पावले, एजाज करोशी, कृष्णा सातपुते, कृष्णात गवळी यांच्यासह १५ हायस्पीड खेळाडूंचा समावेश आहे. प्रेक्षकांसाठी गॅलरींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ही स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी उत्सव ठरणार असून क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
यावेळी माजी नगरसेवक विनायक वडे, उद्योजक इम्रान मकानदार, बबलू मांगोरे, बंटी कांबळे, रवी लोहार, विजय कांबळे, राजू देवर, शिरीष कमते, प्रथमेश लोहार, राहुल निंबाळकर, संतोष कांबळे अरविंद पारळे, चेतन पांगिरे, अभिजीत सांडुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पावसामुळे गटारी तुंबून रस्त्यावर सांडपाणी

Spread the love  गटारीकडेला कचऱ्याचे ढीग; दुर्गंधी, डांसामुळे नागरिक त्रस्त निपाणी‌ (वार्ता) : नगरपालिकेकडून शहरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *