Sunday , July 26 2026
Breaking News

निलजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतकमहोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : निलजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतकमहोत्सव सोहळा रविवार दिनांक 12 एप्रिल व सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याची मुहूर्तमेढ व निमंत्रण पत्रिका अनावरण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी रामदेव गल्ली निलजी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कविवर्य कुसुमाग्रज सभामंडपाची मुहूर्तमेढ पूजन देवस्की पंच गंगाराम मोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच निमंत्रण पत्रिकेचे अनावरण सर्व देवस्की पंचांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला देवस्की पंच भरमा पाटील, संजय पाटील, गोविंद पाटील, सचिन मोदगेकर, शंकर मेणसे, आनंद मोदगेकर, किरण पाटील, तसेच शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, शतक महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष ऍड. लक्ष्मण पाटील, शतक महोत्सव समितीचे सर्व सदस्य मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *