Monday , May 25 2026
Breaking News

मुलींच्या आरोग्यासाठी भीती न बाळगता एचपीव्ही लस घ्यावे

Spread the love

 

आरोग्यसेविका अंकलगी : कुर्ली सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये मार्गदर्शन

निपाणी (वार्ता) : सध्या शालेय पातळीवर विद्यार्थीनीमध्ये एचपीव्ही लस घेण्याबाबत द्विधा मनस्थिती आहे. मात्र पालकांनी स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे असून मुलींच्या आरोग्यासाठी भीती न बाळगता एचपीव्ही लस घेण्याचे आवाहन सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका एस. एस. अंकलगी यांनी केले. त्या रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली (ता.निपाणी) येथील सिद्धेश्वर विद्यालयात सौंदलग प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य दिनाचे औचित्य साधून एचपीव्ही लसीबाबत जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते.
टी. एम. यादव यांनी प्रास्ताविक केले. एच पीव्हीलस, त्याचे फायदे याबाबत अंकलगी यांनी माहिती दिली. शिवाय विद्यार्थिनीनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले. मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी, एचपीव्ही लस ही सुरक्षित असून कोणताही गैरसमज न करता मुलींनी सदृढ आरोग्यासाठी लस घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास एस. एस. साळवी, एस. एस. देसाई, आर. आर. सुतार, आर. ए. पाटील, अनिता बुधाळे, वैशाली माळी, सरिता चौगुले, भारती गुरव, सुरेखा पाटील, विनया मगदूम, यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. के. ए. नाईक यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *