
निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निपाणी येथे १९२५ रोजी पहिली सभा झालेली आहे. या सभेला १२ एप्रिल २०२६ रोजी १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त येथील नगरपालिके जवळील डॉ. आंबेडकर पुतळ्याशेजारी सायंकाळी ६ वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महागाव येथील प्रा. मुकुंद कांबळे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रा. डॉ.अच्युत माने, प्रा. जे. डी कांबळे, प्रा. वसंत जाधव हे उपस्थित राहणार असल्याची माहिती शताब्दी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली.
संतोष मेस्त्री यांनी स्वागत केले.
सुधाकर माने म्हणाले, शताब्दी महोत्सव कमिटीतर्फे वर्षभर विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये धम्म परिषद, १०० गावात सभा, व्यापक जनजागृती करण्यात आली आहे. प्रा. डॉ. आर. के. दिवाकर यांनी, या ऐतिहासिक सभेला १०१ वर्षे पूर्ण होत असल्याने आयोजित अभिवादन सभा समाजप्रबोधनासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले. प्रा. अजित कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
बैठकीस गणू गोसावी, संदीप माने, दिलीप कांबळे, जयसिंग कांबळे, आरेश सनदी, जनार्दन मोहिते, अविनाश माने उपस्थित होते. सुशील कांबळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta