Sunday , July 26 2026
Breaking News

भीमापूरवाडीतील अखंड हरिनाम सप्ताहाची नगरप्रदक्षिणा, काल्याच्या कीर्तनाने सांगता

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : भीमापूरवाडी येथील श्रीराम मंदिरात चैत्र शुध्द पौर्णिमे निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची हिंदी नगरप्रदक्षिणा आणि काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. त्यानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सोहळा काळात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी हरी भजन, दुपारी भोजन विश्रांती, सायंकाळी हरिपाठ, कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. सोहळा काळात श्रीधर महाराज-जत्राट, ज्ञानेश्वर महाराज- हेरवाड, नदाफ महाराज -यळगुड, पन्हाळकर महाज -उत्तूर यांची प्रवचन व कीर्तन सेवा झाली. याशिवाय ज्ञानेश्वरी पारायण व अध्याय पठण करण्यात आले. सोहळ्याच्या सांगता समारंभ दिवशी सकाळी सकाळी ७ वाजता दिंडी नगर प्रदक्षिणा, ९ वाजता बाजीराव पाटील महाराज -सरवडे यांचे काल्याचे किर्तन झाले.
यावेळी गळतगा पीकेपीएसचे अध्यक्ष संजय कागे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, उद्योजक सुखदेव साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब साळुंखे, श्रीधर महाराज, उद्योजक वसंत धारव, विनायक आरडे, पोपट साळुंखे, संजय शेटके, आनंद शिंदे बबन बेलेकर यांच्यासह वारकरी व भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *