Thursday , April 9 2026
Breaking News

सर्वोत्तम श्राविका पुरस्कार मिळाल्याने मीनाक्षीताई पाटील यांचा विविध संस्थातर्फे सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत संस्थेच्या संचालिका मीनाक्षीताई रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त येथील धनगर समाजातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोरगाव पी.के.पी.एस. व अरिहंत सूतगिरणीचे संचालक राजू ऐदमाळे, विठ्ठल ऐदमाळे, बाळू ऐदमाळे, बिरा ऐदमाळे, अनिल ऐदमाळे, बाळू नवाळू ऐदमाळे, दत्ता गावडे, विठ्ठल गावडे, रघू ऐदमाळे, म्हाळू ऐदमाळे यांच्यासह धनगर समाजातील नागरिक उपस्थित होते.
निपाणीचे माजी आमदार प्रा. सुभाष जोशी परिवारातर्फे सुनीता जोशी, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी यांनीही मीनाक्षीताई पाटील यांचा सत्कार केला. यावेळी विनयश्री अभिनंदन पाटील, धनश्री उत्तम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यमगर्णी येथील पी.के.पी.एस. तर्फे अध्यक्ष नितीन नेपीरे, उपाध्यक्ष संतोष पाटील, संचालक प्रशांत पोकले, शेतकरी मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे अध्यक्ष चंद्रकांत पोकले, कुमार मंगावते यांनीही सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मीनाक्षीताई पाटील यांचा सत्कार केला.

About Belgaum Varta

Check Also

भीमापूरवाडीतील अखंड हरिनाम सप्ताहाची नगरप्रदक्षिणा, काल्याच्या कीर्तनाने सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : भीमापूरवाडी येथील श्रीराम मंदिरात चैत्र शुध्द पौर्णिमे निमित्त आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *