Monday , April 13 2026
Breaking News

निपाणीत शनिवारपासून रंगणार ‘अरिहंत’ चषक क्रिकेट स्पर्धा

Spread the love

 

प्रकाशझोतासह गॅलरीची व्यवस्था; सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील जयंती निमित्त आयोजन

निपाणी वार्ता) : बोरगाव येथील सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त, अरिहंत उ‌द्योग समूह व छत्रपती शिवाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवारपासून (ता.११) ‘अरिहंत चषक पर्व -३ – २०२६’ दिवसरात्र टेनिस बॉल आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी गॅलरी शहर प्रकाशझोताची व्यवस्था केली असून तयारी पूर्णत्वाकडे आली आहे.
स्पर्धेतील विजेच्या संघांना अनुक्रमे २ लाख रुपये आणि अरिहंत चषक, १ लाख रुपये आणि चषक, ५० हजार रुपये आणि चषक बक्षीसे देण्यात येणार आहेत.
याशिवाय मलिकावीर खेळाडूला फ्रिज, सर्वोत्कृष्ट फलंदाजला मोबाईल फोन, सर्वोत्कृष्ट गोलंदाजला सायकल आणि प्रत्येक सामन्यातील सामनावीरल चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत निवडक २४ सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामध्ये बेळगाव, विजयपूर, हुबळी, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, तुळजापूरसह मांगले, नारायणवाडी, बोरगाव अशा नामांकित व बलाढ्य संघ सहभागी होणार आहेत. सामने ८ षटकांच्या स्वरूपात खेळवले जातील. गाव पातळीवरील संघांना २ आयकॉन खेळाडू निवडण्याची परवानगी आहे. ही स्पर्धा नॉकआऊट पद्धतीने खेळवली जाईल. स्पर्धेत विजय पावले, एजाज करोशी, कृष्णा सातपुते, कृष्णात गवळी यांच्यासह १५ हायस्पीड खेळाडूंचा समावेश आहे. प्रेक्षकांसाठी गॅलरींची व्यवस्था केली आली आहे. त्यामुळे ही स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी उत्सव ठरणार असून क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
स्पर्धा व्यवस्थेच्या पाहणी प्रसंगी चंद्रकांत मोरे, माजी नगरसेवक विनायक वडे, युवा उद्योजक इम्रान मकानदार, बबलू मांगोरे, बंटी कांबळे, रवी लोहार, विजय कांबळे, राजू देवर, शिरीष कमते, प्रथमेश लोहार, राहुल निंबाळकर, संतोष कांबळे, अरविंद पारळे, चेतन पांगिरे, अभिजीत सांडुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

संविधानाच्या निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  प्रा. मुकुंद कांबळे : शताब्दी महोत्सव कमिटीतर्फे अभिवादन निपाणी (वार्ता) : भारत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *