Sunday , September 20 2026
Breaking News

वैद्यकीय सेवेबद्दल बेनाडीतील राजू मधाळे “बेनाडी नगरी” पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील रहिवाशी आणि सध्या बेळगाव के.एल.ई. हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेले राजू मधाळे यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल प्रसिद्ध कीर्तनकार, व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते ‘बेनाडी नागरी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. येथील जय जवान जय किसान सहकारी संघाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजू मधाळे यांनी निपाणी, चिक्कोडी, हुक्केरीसह बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावातील रुग्णांना विविध योजनांची माहिती सांगणे, रुग्णावर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि शासकीय योजनेतून मोफत शस्त्रक्रिया लवकर मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी कार्य केले आहे. त्यांच्या या अखंडित, अविरत वैद्यकीय सेवा कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी जय जवान जय किसान, सहकार संघाच्या अध्यक्षा रेश्मा महेश गुरव, उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ दिवटे, उद्योगपती अजितराव पाटील, कुमार पाटील, शंकर पोवाडे व संस्थेचे संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *