Monday , April 13 2026
Breaking News

समाजरत्न पुरस्काराने निपाणीमधील नामदेवराव चौगुले बेळगावमध्ये सन्मानित

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील श्री‌ सिद्धरामेश्वर ॲग्रो केंद्राचा ३२ व्या वर्धापन दिन काकती येथे पार पडला. अम्मा फाऊंडेशनचे संस्थापक बाळासाहेब उदागट्टी व भरमण्णा एल. उप्पार (राज्यमंत्री, कर्नाटक सरकार) वाढदिवसही पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१ समाजसेवकांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात निपाणी येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेवराव विठोबा चौगुले यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नामदेवराव चौगुले यांनी बाळासाहेब उदागट्टी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ६० गुलाबरोपे भेट दिली. या उपक्रमातून पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा करण्याचा संदेश समाजाला देण्यात आला. प्रत्येक रोप हे निसर्गाशी नाते दृढ करणारे आणि सकारात्मकतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हेच जीवनदान हा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष दाद मिळवून गेला. नामदेवराव चौगुले यांनी हा सन्मान केवळ स्वतःचा नसून कुटुंबीय, सहकारी आणि पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांचा असल्याचे नमूद केले. अशा सन्मानामुळे पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा व ऊर्जा मिळते, असेही त्यांनी सांगितले. एक रोप लावा, एक जीव वाचवा आणि एक सुंदर भविष्य घडवा, असा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

संविधानाच्या निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  प्रा. मुकुंद कांबळे : शताब्दी महोत्सव कमिटीतर्फे अभिवादन निपाणी (वार्ता) : भारत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *