Sunday , September 20 2026
Breaking News

युद्धाचा परिणाम थेट स्वयंपाकघरापर्यंत

Spread the love

 

खाद्यतेलांची प्रतिकिलो २०-२५ रुपयांनी दरवाढ ; महिलांचे स्वयंपाकाचे बजेट कोलमडले

निपाणी (वार्ता) : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली असून त्याचा परिणाम आता जीवनावश्यक वस्तूंवर दिसत आहे. स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरखर्चावर ताण वाढला आहे.
सध्या निपाणी बाजारपेठेत सोयाबीन, पाम, सूर्यफूल तेलाची आवक घटली आहे. पाम तेल इंडोनेशिया व मलेशिया, सोयाबीन तेल ब्राझील तर सूर्यफूल तेल युक्रेन, रशिया येथून आयात होते. युद्धामुळे या देशांतील पुरवठा साखळी बाधीत झाल्याने दर वाढल्याचे व्यापान्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ झाली आहे. युद्धस्थिती कायम राहिल्यास इंधन व वाहतूक खर्च वाढून महागाईत आणखी भर पडायाची शक्यता व्यक्त होत आहे.
——————————————————————-
‘युद्धजन्य परिस्थितीमुळे खाद्यतेलाच्या किमती प्रतिकिलो २० ते २५ रुपयांनी वाढत्या आहेत. वाहतूक खर्च वाढत्यास दर आणी वाढण्याची शक्यता आहे. ग्राहक आता डब्याऐवजी सुटे तेल घेऊ लागले आहेत.’
-अमर उपाध्ये, किराणा व्यापारी, निपाणी
——————————————————————–
खाद्यतेलाचे दर (प्रति किलो)
*जुने दर *नवीन दर
*सोयाबीन * १४० *१६५ रुपये
*सूर्यफूल * १७५ * १९० रुपये
*पाम * १६० * १७० रुपये
*शेंगदाणा *१८० * २०० रुपये
*सरकी *१४० * १६५ रुपये

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *