माजी नगरसेवक जुबेर बागवान : पालिका पदाधिकार्यांना निवेदन
निपाणी : येथील आंबा मार्केटमध्ये बर्याच वर्षापासून भाजीपाला व फळमार्केट भरत आहे. शहरासह ग्रामीण भागातील व्यापारी व शेतकरी खरेदी-विक्रीच्या निमित्ताने येतात. पण दरवर्षी पावसाळ्यात दलदल निर्माण होऊन सर्वांची गैरसोय होत आहे.
शिवाय विक्रीसाठी आलेला माल चिखलात ठेवावा लागत असल्याने दर कमीजास्त मिळत आहे. परिणामी शेतकरी, व्यापारयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ आंबा मार्केटमध्ये सुविधा देण्याच्या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक जुबेर बागवान यांनी नगराध्यक्ष जयवंत भाटले, पालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांना दिले.
आंबा मार्केटमध्ये शौचालय निर्मिती केली आहे. पण पाणी नसल्याने ते बंद आहे. त्यामुळे महिला व्यापार्यांची गैरसोय होत आहे.
बर्याच दिवसापासून परिसरातील वीज पुरवठाही बंदच आहे. मार्केटमधील कामाबाबत चालढकल होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. तरी पालिका प्रशासनाने सुविधा देऊन सहकार्य करावे, असे आवानही निवेदनात केले आहे.
नगराध्यक्ष भाटले यांनी निवेदन स्वीकारून आंबा मार्केटमध्ये सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी बालेचाँद बागवान, जावेद गवाणे, उबेद सातारे, मूदसर बागवान, अनिस बागवान, मोईन बागवान, शोएब बागवान, एजाज बागवान, मोहसीन बागवान, सरफराज बागवान, यासीन बागवान, अल्लाबक्ष बागवान, सोहेल बागवान, जैद बागवान, यासीन बागवान यांच्यासह व्यापारी व ग्राहक उपस्थित होते.
