सुदैवाने जीवितहानी नाही
कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या कोगनोळी (ता. निपाणी) येथील आरटीओ कार्यालयाजवळ ट्रक पलटी झाला. ही घटना शुक्रवार दि. 17 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अशोक लेलँड ट्रक क्रमांक (टी.एन.13 टी. 2412) हा ट्रक चेन्नईहून मुंबईकडे काचा घेऊन जात होती.
येथील महामार्गावरील आरटीओ कार्यालयामध्ये रक्कम भरायला गेले असता गाडीचा हँन्डब्रेक फेल होऊन गाडी सर्व्हिस रोडवर पलटी झाली.
या ट्रकमध्ये ड्रायव्हर व क्लिनर हे दोघेजण होते. सुदैवाने यातील कोणालाही इजा झाली नाही. परंतु ट्रकमधील काचा सर्वत्र पसरल्या होत्या.
यावेळी हायवे पेट्रोलिंगचे सुपरवायझर प्रकाश बामणे, संतोष नाईक, रमेश नाईक आदी उपस्थित होते. या घटनेची माहिती निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाला दूरध्वनीवरुन कळविण्यात आली आहे.
Check Also
देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान
Spread the love मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या …