कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरण होणार असून या ठिकाणी शेकडो एकर जमीन यामध्ये जाणार आहे. या ठिकाणी सहापदरीकरण रस्त्याला येथील शेतकर्यांचा विरोध नसून या ठिकाणी होणार्या अन्य ऑफिस व मॉल आधी गोष्टींना विरोध असल्याचे मनोगत ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने यांनी व्यक्त केले.
मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना कोगनोळी तालुका निपाणी येथील शेतकर्यांच्या वतीने निवेदन देताना ते बोलत होते. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले यांनी यासंदर्भात शेतकरी व अधिकारी यांच्यामध्ये बैठक घेण्यात येईल व तिथून पुढे सर्व दिशा ठरविण्यात येईल असे सांगितले.
खासदार अण्णासाहेब जोल्ले यावेळी बोलताना म्हणाले, येणार्या आठ दहा दिवसांमध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अधिकार्यांची बैठक घेऊन संबंधित विषयावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी अनंत पाटील, संदीप चौगुले, नारायण पाटील, नागेश पाटील, राजू पाटील, उमेश परीट, बाळासाहेब हादिकर, विजय सावजी, पुंडलिक माळी, सचिन चौगुले, अरुण पाटील, अफजल मुल्ला, राजू चौगुले, प्रकाश परीट, अनिल माने, तानाजी जाधव, युवराज पाटील, रावसाहेब माणगावे, नारायण पाटील, गिरीश गुरव, मधुकर इंगवले, गब्बर शिरगुप्पे, संतोष सोलापुरे, विठ्ठल माने, आनंदा माने, अन्वर शेंडूरे, शशिकांत माने यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …