खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापासुन ते नंदिहळ्ळी गावापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन धारकांना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होत आहे. त्याचबरोबर खानापूर-गर्लगुंजी-नंदिहळ्ळी बससेवाही रस्त्याची दुर्दशा झाल्याने व रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने सुरळीत धावत नाही. त्यामुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यासाठी लोकप्रतिनिधी तसेच संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी रस्त्याची पाहणी करून रस्ता त्वरीत दुरूस्त करण्याची मागणी गर्लगुंजी, नंदिहळ्ळी आदी गावच्या नागरिकांतून होत आहे.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …