मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातल्या त्यांच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काटोलमधील त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्या घरी, त्यांच्या हॉटेलवर आणि इतर ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकून तपास सुरू केला आहे. याआधी ईडी देखील अनिल देशमुख यांची चौकशी करत असून त्यात आता आयकर विभागाची देखील त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, छापा टाकण्यासाठी आयकर विभागाची पथकं नागपूरमधली नसून बाहेरून आल्याची माहिती मिळत आहे.
Check Also
टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन
Spread the love मुंबई : टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना …