Wednesday , March 26 2025
Breaking News

शेतकर्‍यांवर अन्याय झाल्यास आंदोलन

Spread the love

राजू पोवार : ग्रामीण पोलिस ठाण्याला निवेदन
निपाणी : कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त परिसरातील जमीन आरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय होणार असून याबाबत चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते.
त्याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराचे निवेदन रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांना शुक्रवारी (ता.17) देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, कोगनोळीपासून होनगापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार आहे. त्यासाठी कोगनोळीतील शेकडो एकर जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून संपादित होणार आहे. रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी सहा पदरीकरणाव्यतिरिक्त जमीन देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. त्याबाबत संबंधितांना निवेदनही देण्यात आले. त्याची दखल घेत निपाणी येथे अधिकार्‍यांनी भेट दिली.
सहापदरीकरणाला विरोध नसून अतिरिक्त जमीन न देण्यासाठी शेतकर्‍यांनी लढा सुरू ठेवला असून जिल्हाधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना निवेदन दिले आहे. दोन दिवसांत या परिसराची पाहणी करण्यात आली. रयत संघटनेचे चिकोडी तालुका अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी बंगळूर येथील गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून नेमकी समस्या, याठिकाणचे उद्योग व्यवसाय, शाळा याबाबतीतही चौकशी करण्यात आली आहे. सहा पदरीकरणाला शेतकर्‍यांचा विरोध नसून अतिरिक्त जमीन संपादन करू नये. कोगनोळीनजीक असलेली जमीन बागायत असून शेतकर्‍यांना मोठा फटका बसू शकतो. रस्त्याच्या बाजूला अनेक व्यवसाय थाटले आहेत. अनेकांनी कर्ज काढून छोटे-मोठे उद्योग उभा केले आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाव्यतिरिक्त अधिकचे विस्तारीकरण केल्यास आंदोलन छेडण्यात येईल. प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांची बाजू विचारात घेऊन नियोजित प्रकल्प गायरानमध्ये उभारण्याची करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उपनिरीक्षक कुंभार यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रयत संघटनेचे निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, निपाणी तालुका युवा ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब हादिकर, संदीप चौगले, मन्सूर शेंडूरे, ईलाही मुल्ल, राजकुमार पाटील, नारायण पाटील, रावसाहेब माणगावे, तानाजी जाधव, अरूण पाटील, सुनिल माने, संतोष सोलापूरे, नागेश पाटील,अनंत पाटील, पुंडलिक माळी, विजय सावजी, सचिन चौगुले, संतोष चौगुले, वासीम शिरगुप्पे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निडसोशी गेटसमोरील बेकरी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

Spread the love    संकेश्वर : जवळच असलेल्या निडसोशी गेटसमोरील बेकरी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *