कोगनोळी : येथील भगवा चौक येथे असणार्या पंत बाळेकुंद्री महाराज मंदिरात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास संपन्न झाला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना युवराज पाटील म्हणाले, समस्त हिंदू धर्मीयांच्या वतीने 3 मार्च ते 1 एप्रिल (फाल्गुन अमावस्या) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात येतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मियांच्या साठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळेच हिंदू संस्कृती टिकून आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव प्रत्येकांना व्हावी म्हणून हा बलिदान मास पाळला जातो.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, तात्यासाहेब कागले, अमित गायकवाड, संभाजी डोंगळे, मोहन डोंगळे, ब्रह्मनाथ चौगुले, सतीश पाटील, स्वप्नील चव्हाण, विशाल नागराळे, दादासाहेब नागराळे, अजित पाटील, सचिन इंगवले, किरण पसारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, गावातील तरुण मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
