निपाणी : येथील कोल्हापूर वेळेस व्यापारी मित्र मंडळ आणि महावीर मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त मोफत दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. मंडळाचे उपाध्यक्ष राजू शिंदे यांनी स्वागत केले. अध्यक्ष प्रथमेश जासूद यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. चंद्रकांत जासूद यांनी, दोन वर्षापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत मंडळांनी विविध प्रकारचे आरोग्य शिबिरे व जनजागृतीसारखे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. शिबिरात डॉ. संकेश पाटील यांनी दिवसभरात 85 रुग्णांची मोफत तपासणी केली.
कार्यक्रमास ऋषिकेश जासूद राहुल जासूद, निलेश शिंदे, रवींद्र बोरगावे, रोहित बोरगावे, राहुल हालभावी, विनायक शिंदे, शिवम जासूद, अनिकेत पाटील, यश दैव, हर्ष दैव, उत्तम पाटील, महादेव हलभावी, राजेंद्र बोरगावे, बाळासाहेब जासूद, झुंजार दबडे, हरीश जासूद, संजय सूर्यवंशी, संदेश सूर्यवंशी, पुरुषोत्तम तासगावकर यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
Check Also
ऊस, सोयाबीन दरासह शेतकऱ्यांच्या समस्यांबबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा
Spread the love निपाणी (वार्ता) : माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी …