प्रा. राजन चिकोडे : प्रवाशांचा नाहक त्रास वाचवावा
निपाणी : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र शासनाने आंतरराज्य एसटी बस प्रवेशबंदी केली आहे. यामुळे कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य उपचारासाठी या मार्गावरील प्रवाशांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कागल ते निपाणी या 19 कि.मी. अंतरासाठी वडाप वाहनास 100 रूपये द्यावे लागत आहेत. कांही नोकरदारांना दिवसा 300 रू.पगार व प्रवासासाठी 200 रुपये खर्च अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर-बेळगाव महामार्गावरील सर्व बस सुरू करण्याच्या मागणीचे पत्रक प्रा. राजन चिकोडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेस महाराष्ट्रात प्रवाशी घेऊन जातात पण महाराष्ट्रातली प्रवासी कर्नाटकात आणत नाहीत यामुळे बस रिकामी येते. मात्र इंधन व टोलचा भुर्दंड परिवहन महामंडळावर त्यामुळे एसटी मंडळाचाही तोटा होत आहे.
कोरोनाबाबत दक्षता घेतली पाहिजे पण सध्या कोरोना आरामात जनता त्रासात अशी स्थिती झाली आहे. कोरोना प्रतिबंधकबाबत असणारे नियमात मास्क, सॅनिटायझर, सामाजिक आंतर, त्याचबरोबर लसीकरण प्रमाण पत्र या अटी सक्तीच्या कराव्यात. दररोज प्रवास करणारे आर.टी.पी.सी.आर प्रत्येक 72 तासानंतर करू शकतील का? असा प्रश्न आहे.
नोकरदार वर्गाला जाताना येताना प्रवास कसा होणार हीच चिंता आहे. असा चिंताग्रस्त व्यक्तीचे कामात लक्ष लागेल का? सध्या पुरूष नोकरदार वर्ग दुचाकी वाहनावरून नाईलास्तव जात येत आहेत. यातील अनेकांनी अपघातही अनुभवला आहे. नोकरदार महिला न वर्गाला तर हा प्रवास म्हणजे तारेवरची कसरत आहे. कोल्हापूर व बेळगांव आगार व्यवस्थापकांनी सामंजस्य करार करून कोरोना नियमाचे पालन करीत बेळगांव, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर या बसस्थानकावर दोन्ही राज्याच्या बसेस येणे जाणेसाठी एकमेकांना परवानगी द्यावी. नागरिकांचे होणारे हाल वाचवावे. याकामी दोन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधीनी आपल्या मतदारासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही प्रा. राजन चिकोडे यांनी पत्रकात आहे.
Check Also
प्रेम विवाह नाकारल्याच्या रागातून दोघांची हत्या
Spread the love निपाणी : प्रेम नाकारल्याचा राग मनात धरून तरुणाने प्रेम करणाऱ्या मुलीच्या आईची …