ममदापूर येथील घटना; दोघेजण गंभीर
निपाणी : निपाणी इचलकंजी मार्गावर ममदापूर (केएल) येथील अंबिका देवालयाजवळ दुचाकीला अपघात होऊन युवक ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. अनिकेत सुरेश यादव (रा. ममदापूर, वय 20) असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत.
अनिकेत यादव हा संकेत संतोष कदम (वय 22) व लखन बिराप्पा चिंगळे (23) यांच्यासह दुचाकीवरून (केए 23-7179) गणेश विसर्जनासाठी लागणारे साऊंड सिस्टिम आणण्यासाठी गळतगा येथे जात होता. ममदापूर येथील अंबिका देवालयाजवळ आल्यानंतर दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात घडला.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या अनिकेत यादव याला कोल्हापूर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. लखन चिंगळे याला अधिक दुखापत झाल्याने निपाणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र आजन्नावर व सहकार्यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली आहे. मयत अनिकेत यादव याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. दुचाकी अपघातात अनिकेत यादव यांचे निधन झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Check Also
यमगर्णीत सामाजिक कार्यकर्त्याचा खून
Spread the love सौरभच्या फसवणुकीचा राग; हिंडलगा कारागृहात रवानगी निपाणी(वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील …