बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघात बुधवारी विविध विकासकामांना चालना देण्यात आली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर बेंगळुरूमध्ये विधानसभा अधिवेशनात सहभागी झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीनी विकासकामांचा शुभारंभ केला.
मतदारसंघातील कुद्रेमानी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 11 लाख रुपये निधीतून नूतन इमारत बांधकामाचे भूमीपूजन स्थानिक लोकप्रतिनिधी व युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी गावातील पंच, तालुका पंचायत सदस्य शुभांगी राजगोळकर, शंकर पाटील, अरुण देवन, दीपक पाटील, वैजू राजगोळकर व शाळा कर्मचारी उपस्थित होते.
रस्ता डांबरीकरण
पाऊस-महापुरामुळे खराब झालेला मंडोळी-सावगाव गावांना जोडणारा रस्ता डांबरीकरण व दोन्ही बाजूला कालवा निर्मिती कामाला स्थानिक लोकप्रतिनिधी व मृणाल हेब्बाळकर यांनी भूमिपूजन करून चालना दिले. यावेळी गावातील पंच, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, कंत्राटदार राचनवर आदी उपस्थित होते.
जलजीवन मिशन कामे
बी. के. कणगाव गावात 36 लाख रुपये निधीतून जलजीवन मिशन कामाचा शुभारंभ स्थानिक लोकप्रतिनिधी व मृणाल हेब्बाळकर यांनी नारळ फोडून केला. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष, सर्व सदस्य, गावातील पंच व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
बिजगर्णी शिक्षण संस्थेबाबत आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
Spread the love पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचा वाद बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण …