
निपाणीतील शिवपुतळ्यास भेट
निपाणी (वार्ता) : निपाणी हे शहर कर्नाटक सीमाभागात असले तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आहेत. त्यामुळे दरवर्षी या परिसरात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी केली जाते. शेकडो कार्यकर्ते शिवजयंतीसह विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांचे हे शिव कार्य कौतुकास्पद आहे. यापुढील काळातही मराठी भाषकांच्या आपण सदैव पाठीशी आहोत, असे मत कोल्हापूर येथील खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले. येथील शिवाजी चौकातील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळास यांनी सोमवारी (ता.१८) भेट दिली. त्यावेळी संभाजीराजे बोलत होते.
मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे सेक्रेटरी ओंकार रविंद्र शिंदे परिवार आणि अरुण वैद्य परिवार यांच्या निवासस्थानी आले असतांना शिवतीर्थ छत्रपती मध्यवर्ती शिवाजी चौक येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळ व शिवप्रेमी नागरिकांनी स्वागत केले. यावेळी महिलानी औक्षण केले. मध्यवर्तीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी त्यांच्या सोबत आलेल्या पाहुण्यांना शिवतीर्थ शिवाजी चौक येथील महाराजांचा पुतळा त्यांच्या आजोबांच्या हस्ते बसवण्यात आल्याची आठवण करून दिली. शिवाय मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी नगरसेवक रविंद्र शिंदे, ओंकार शिंदे, गजानन शिंदे, कपिल शिंदे, सोमनाथ शिंदे, तुषार शिंदे, मध्यवर्तीचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद, संजय तिप्पे, प्रवीण पोवार, भास्कर आजरेकर, नितीन साळुंखे विनय कदम, आनंद परीट, ज्ञानेश्वर ढेरे, इंद्रजीत बगाडे, सुनील कांबळे, करण माने, मदन वैद्य, चैतन गिरी, शैलेश चव्हाण, सुशांत बुडके, पांडुरंग भोई, अरुण वैद्य, मदन वैद्य, सत्यजीत वैद्य, संदीप केसरकर, प्रकाश इंगवले यांच्यासह मध्यवर्ती शिवाजी चौक तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta