रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला : निपाणीत महाप्रसादाचे वाटप
निपाणी : स्वर्गीय एच. ए. मोतीवाला यांनी रत्नशास्त्राबरोबर सामाजिक उपक्रमातील सहभाग कायम ठेवला होता. महाप्रसाद अथवा अन्य स्वरूपात अन्नदान करण्याचा ते नेहमी प्रयत्नशील असत. ही परंपरा मोतीवाला परिवाराकडून नेहमी जपणूक केली जात आहे.
महाप्रसदाच्या रूपाने अन्नदान करताना मनाला एक वेगळी अनुभुमती येत असते. यातून मिळणारा आशिर्वाद मनाला आणि कार्याला प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिदपादन रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी केले. येथील पावले गल्ली पीटीएम बॉईज ग्रुपच्या 11 वर्षीच्या महाप्रसाद वाटप कार्यक्रमात रत्नशास्त्री मोतीवाला बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, रत्नशास्त्र व्यवसाय हा एक सामाजिक बांधीलकी जपणारा व्यवसाय आहे. याच बांधलकीतून मोतीवाला परिवार सामाजिक कार्यातही अग्रेसर राहिला आहे. हे सामाजिक कार्य कायम सुरू राहणार असून या कार्यात कधीच खंड पडणार नसल्याचे सांगितले. प्रारंभी ए. एच. मोतीवाला, अध्यक्ष अतिश बेलेकर, उपाध्यक्ष विनायक चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते महाप्रसदाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शेकडो गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमास अमित पावले, प्रथमेश राऊत, सनी पावले, नवल बागे, अक्षय जाधव, विक्रम सुतार, ओमकार बागे, अमित जाधव, प्रणव पावले, विराज आवळेकर, अभिजीत पावले, हर्ष जाधव, गणेश कलकुटगी, गिरीश पावले यांच्यासह कार्यकर्तेव मान्यवर उपस्थित होते.
