
सौंदलगा : भिवशी येथे दोन अंगणवाडी खोल्यांचा भूमीपूजन शुभारंभ आशा ज्योती विशेष मुलांच्या शाळेचे अध्यक्ष ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर. बी. मगदुम यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा पंचायती फंडातून या अंगणवाडी मंजूर झाल्या असून यातील एक अंगणवाडी हायटेक होणार असून यासाठी 18 लाख मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दुसरी अंगणवाडीसाठी 13 लाख मंजूर केलेले आहेत. याचे बांधकाम, निर्मिती केंद्र बेळगाव यांच्याकडून करण्यात येणार आहे. खासदार अण्णासाहेब जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले यांनी आतापर्यंत भिवशीसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याबरोबरच निपाणी मतदारसंघातील विविध विकासकामाचा धडाका लावला आहे. यानंंतर सचिन पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. ज्योतीप्रसाद जोल्ले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबरोबरच हालशुगरचे व्हाईस चेअरमन एम. पी. पाटील, निपाणी ग्रामीण भाजपचे अध्यक्ष पवन पाटील व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्या व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर निपाणी ग्रामीण भाजपचे अध्यक्ष पवन पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, विकासाभिमुख कामातूनच मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची निपाणी मतदारसंघात ओळख निर्माण झाली आहे. आज भिवशी येथे दोन अंगणवाडी शाळांचे भूमिपूजन होत आहे. निपाणी मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाका लावला आहे. विकासकामात राजकारण न आणता केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध विकास योजना निपाणी मतदारसंघात राबवत आहेत. यावेळी हालशुगरच्या संचालिका उज्वला शिंदे, ग्रामपंचायत अध्यक्षा अर्चना कोगनोळे, उपाध्यक्ष सुजाता चौगुले, ग्रामपंचायत सदस्य संजय लोहार, सुवर्णा गुरव, प्रकाश शिंदे, किशोर हरदारे, सबगोंड पाटील, महादेव कांबळे, दादासाहेब कोगनोळे, अशोक पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष मधुकर पाटील, संजय पाटील, शरद चौगुले, नितीन पाटील, रामगोंडा पाटील, बाळासाहेब कांबळे, प्रदिप गुरव, शिवगोंडा पाटील, अभियंता शशिधर पाटील यासह ग्रामस्थ, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta