
निपाणी : चंदन शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळते. एका लिटर तेलाचा दर तीन ते चार लाख रुपये आहे त्यामुळे चंदनाची चोरी केली जाते म्हणून चंदन चोरांना फाशी देण्यात यावी, असे मत निपाणी हुडको कॉलनीमधील कृष्णा शितोळे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात चंदन शेती सेमिनार संपन्न झाले त्यामध्ये उत्तर कर्नाटकमधून प्रतिनिधी म्हणून सहभागी होवून बोलत होते. अध्यक्षस्थानी नितीन पटेल हे होते.
कार्यक्रमाचे आयोजन चंदन विकास असोसिएशन गजरात यांनी केले होते. यावेळी पियुष महाराज यांनी ईशस्तवन गायले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
शितोळे पुढे म्हणाले की, चंदन चोरीत वन अधिकारी सामिल असल्यास त्याला बडतर्फ करून 1964च्या कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी म्हणून शेतकऱ्यांनी चंदनाची नोंद सातबारावर करून चोरी झाली तर पोलीसात गुन्हा दाखल करावा.
याप्रसंगी नितीन पटेल, डॉ. डी. एस. राठोड, डॉ. आनंत पद्मनाभन, डॉ. दिगंबर मोकाट यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमधून शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta