Tuesday , March 3 2026
Breaking News

अकोळ शर्यतीत बाहुबली पाटील यांची बैलगाडी प्रथम

Spread the love


विविध गटात शर्यती : भैरवनाथ यात्रेची सांगता
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित विनालाठी-काठी बैलगाडी शर्यतीत अकोळच्या बाहुबली पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे 10 हजार 2 रुपये बक्षीस मिळविले. विविध धार्मिक कार्यक्रमांनी या यात्रेची सांगता करण्यात आली.
जनरल बैलगाडी शर्यतीत साताप्पा आरडे-वाघापूर, आर. एन. गुडसे यांच्या बैलगाड्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे 7001 रुपये व शिल्ड आणि 5001 रुपये असे बक्षीस पटकावले. घोडा-बैल गाडी शर्यतीमध्ये केतन मांगुरे-अकोळ, पेरू जुबेर – कवठेसार, संदीप वाघमोडे-अकोळ, घोडागाडी शर्यतीमध्ये राजू तुकान -चिखली, अनिल गावडे- खडकलाट, सचिन काटकर-निपाणी, बिनदाती घोडा- बैलगाडी शर्यतीत बंडा साबळे- अकोळ सुहास कडोले-भोज, गिरिष पुंडे-अकोळ गावगन्ना बैलगाडी शर्यतीत मधुकर वाघमोडे, आनंदा पाटील, सूरज फराळे यांच्या बैलगाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविला.


प्रारंभी सुनील गुरव, शरद कोळी, मनोज मलाबादे, अशोक नांदेकर, म्हाळू हरके यांच्या हस्ते मैदानपूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी यात्रा कमिटीचे रितेश पाटील, रावसाहेब राऊत, रावसाहेब चव्हाण, आप्पासो सोळांकूरे, दगडू वडर, दादासाहेब भोई, ओंकार भारमल, बाजीराव पुंडे, सारंग मुतालिक यांच्यासह यात्रा कमिटी सदस्य व शर्यत शौकीन उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी, वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर; सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संस्थापक फिरोज चाऊस

Spread the love जागतिक वन्य दिन विशेष जनजागृतीसह शिकार थांबवणे गरजेचे निपाणी (वार्ता) : जैवविविधतेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *