
निपाणी (वार्ता) : मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे यावर्षी भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंतीनिमित्त यंदा इतिहासात प्रथमच सोमवारी (ता.२) सकाळी ९ वाजता शिव पुतळ्यावर माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सतीशअण्णा जारकीहोळी यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे. तत्पूर्वी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार यांच्या हस्ते शिव पुतळ्यास अभिषेक, जिजामाता महिला मंडळाकडून पाळणा सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पुष्पवृष्टी केली जाणार असल्याची माहिती स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक नवनाथ चव्हाण यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta