युवा नेते उत्तम पाटील : शेंडूरमध्ये विविध कामांचा प्रारंभ
निपाणी : बरीच वर्षे राजकारणातील विविध पदे भुषवूनही अजूनही दुर्गम भागातील पाणी, रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधा प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा भागातील नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही वास्तू स्थिती असताना लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पण आपल्याकडे कोणतीही सत्ता नसताना सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. यापुढील काळातही लोकोपयोगी कामे करण्यासाठी आपण तत्पर आहोत, असे मत बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. शेंडूर (ता. निपाणी) येथे रासाई देवी मंदिर परिसर शेड उभारणी व रस्ताकामाचा प्रारंभ करून उत्तम पाटील बोलत होते.
या दोन्ही कामासाठी माजी विधान परिषद सदस्य विवेक पाटील यांच्या फंडातून प्रत्येकी पाच लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून ही कामे केली जाणार आहेत.
अण्णाप्पा वरुटे यांनी, अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून युवा नेते उत्तम पाटील हे बर्याच वर्षापासून अतिवृष्टी महापूर व कोरोना काळात मदतीचा हात देत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक नेहमीच त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत उपाध्यक्षा रूपाली धोंडफोडे, पुंडलिक कुंभार, पांडुरंग तोडकर, मारुती यादव, युवराज धोंडफोडे, शिवाजी लाड, धोंडीबा नार्वेकर, नामदेव पाटील, गजानन कुंभार, विठ्ठल राजपूत, पांडुरंग शिंदे, बबन शेंडगे, पांडू पाटील, युवराज पाटील, दत्ता मोरे, रघुनाथ पाटील, महादेव पाटील, मारुती पाटील, विशाल कुंभार, संजू लाड, सुनिता रजपूत, माधुरी पाटील, विद्या पाटील, राधाबाई कुंभार, विद्या मिसाळ, पांडू शिंदे, सुरेश मांगुरे, विठ्ठल राजपूत, पांडू तोडकर, संभाजी आंबोले, शिवाजी लाड, शिवाजी वाडेकर, गजानन कुंभार, धोंडिबा तोडकर, एस. डी. कांबळे, तानाजी शिंदे, दत्ता मोरे, रघु पाटील, महादेव पाटील, मारुती पाटील, अन्नाप्पा लाड, गजानन कुंभार, नामदेव पाटील, राकेश कुंभार, बाळू वरुटे, यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …