श्रीराम सेना हिंदुस्तान संघटना : शहर पोलिसांना निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व परिसरात असलेल्या मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा, अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्यावतीने येथील शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांना देण्यात आले.
परिसरातील अनेक मशीदवर बेकायदेशीर भोंगे आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी बेकायदेशीर भोंगे उतरवा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाची प्रशासनाने अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. उपनिरीक्षक गर्लहोसुर यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तान संघटना चिकोडी जिल्हाध्यक्ष अॅड. निलेश हत्ती, श्रीनिवास चव्हाण, संदीप मोहिते, प्रसाद औंधकर, प्रशांत केस्ती, दीपक खापे, सुरज काशीदकार, विनायक शेटके, कैवल्य देसाई, सुजल औंधकर, अर्जुन भट, वैभव पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta